Realme C11 खरेदी करण्याची आज संधी, काही मिनिटांतच हातोहात विकला जातो हा बजेट फोन

स्मार्टफोन कंपनी रियलमीने गेल्या काही दिवसांत बजेट सेगमेंटमध्ये Realme C11 स्मार्टफोन लाँच केला आहे. फ्लॅश सेलमध्ये हा फोन खरेदी करता येणार आहे. दरवेळी काही मिनिटांतच आउट ऑफ स्टॉक होणारा हा फोन जर आजवर तुम्ही खरेदी करू शकला नसाल तर आज दुपारी 12 वाजता होणाऱ्या सेलमध्ये फ्लिपकार्टवर हा फोन घेता येणार आहे.

मुंबई : टेक कंपनी रियलमीची C-सीरीज बजेट सेगमेंटमध्ये खूपच लोकप्रिय असून या कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Realme C11 ला खूपच लोकप्रियता मिळत आहे. या डिव्हाइसची कमी किंमत आणि दमदार बॅटरीमुळे फ्लॅश सेल सुरू होताच हा आउट ऑफ स्टॉक होतो. जर आतापर्यंत हा फोन तुम्ही विकत घेऊ शकला नसाल तर आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणाऱ्या सेलमध्ये संधी मिळणार आहे. फोन रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवरूनही खरेदी करता येईल.

किंमत आणि ऑफर्स

Realme C11ची किंमत 7,499 रुपये आहे आणि या किंमतीला फोनचे एकमेव 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरियंट खरेदी करता येईल. ग्राहकांना हा फोन ग्रीन आणि रिच ग्रे रंगात ऑर्डर करता येईल. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सला 5 टक्के डिस्काउंट आणि ॲक्सिस बँक कार्ड युजर्सला 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

Realme C11 ची वैशिष्ट्ये

>> 6.5 इंचाचा डिस्प्ले

>> 720×1600 पिक्सल्स रेझोल्युशन

>> मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर

>> 2 जीबी रॅम

>> 32 जीबी इंटर्नल स्टोरेज

>> मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढविण्याची सुविधा

>> ड्युअल कॅमरा सेटअप

>> 13 मेगापिक्सल चा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमरा सेंसर

>> सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

>> 5000mAh ची पावरफुल बॅटरी

>> बॅटरीला रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट