Realme चा पहिल्यांदाच इलेक्ट्रिक टूथब्रश लाँच, 90 दिवस चालणार बॅटरी

जगातील सुप्रसिद्ध स्मार्टफोन तयार करणारी कंपनी Realme आपला इलेक्ट्रिक टूथब्रश Realme M1 Sonic लाँच केला आहे. कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे. या इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये 90 दिवसांचे बॅटरी बॅकअप टिकवून ठेवण्याची क्षमता असणार आहे. उपलब्ध माहितीनुसार Realme M1 Sonic ने आज (३ सप्टेंबर) भारतात दुपारी 12:30 वाजता हा टूथब्रश लाँच केला आहे.

मिळणार फास्ट चार्जिंग वायरलेस सपोर्ट

या गॅजेटच्या खास फीचरबाबत सांगायचं झालं तर, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार फास्ट चार्जिंग सपोर्टसह हा इलेक्ट्रिक टूथब्रश 90 दिवसांची बॅटरी टिकवून ठेवण्यास सक्षम आहे. Realme M1 Sonic चार क्लिनिंग मोड्स सुविधेसह उपलब्ध आहे. यात नाजूक (sensitive) दातांसाठी Soft Mode for sensitive teeth सारखे फीचर्स उपलब्ध आहे. सोबतच Clean Mode for daily use, White Mode for deep cleaning आणि Polish Mood for shining teeth सारख्या दमदार मोड्सचाही समावेश आहे. हा इलेक्ट्रिक टूथब्रश व्हाइट आणि ब्लू कलर वेरियंट्समध्ये लाँच झाला आहे. या इलेक्ट्रिक टूथब्रशचे हेड मेटल फ्री आहे. या सुपर गॅजेटमध्ये अँटी बॅक्टेरियल ब्रिसल्स दिले आहेत. कंपनीकडून या गॅजेटच्या किंमतीबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही.