redmi 9 power launched in india features price specifications sale date
Redmi 9 Power ची भारतात एंट्री, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Redmi 9 पावर मध्ये 6000mAh बॅटरी दिली असून ती रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येते. फोन मध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज चा पर्यायही दिला आहे.

नवी दिल्ली : शाओमीचा बजेट हँडसेट Redmi 9 Power ने भारतात एंट्री केली आहे. नव्या रेडमी 9 वापरमध्ये क्वाड रिअर कॅमेरा आणि वाटरड्रॉप-स्टाइल नॉच देण्यात आली आहे. रेडमीचा हा लेटेस्ट फोन MIUI 12 सह येतो. रेडमी 9 पॉवर मागील महिन्यात चीनमध्ये लाँच झालेल्या रेडमी नोट 4 जी ची रीब्रँडेड आवृत्ती आहे, पण कॅमेरा, रॅम आणि स्टोरेजचा फरक आहे. रेडमीचा हा फोन सॅमसंग गॅलेक्सी एम 11, विवो वाय 20 आणि ओप्पो ए53 ला टक्कर देईल.

Redmi 9 Power: किंमत व उपलब्धता

रेडमी 9 पावरच्या 4 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरियंटची किंमत भारतात 10,999 रुपये आहे, तर 4 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरियंट 11,999 रुपयांत विकत घेता येईल. स्मार्टफोन ब्लेजिंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फेयरी रेड आणि माइटी ब्लॅक कलर मध्ये मिळेल. हा फोन ॲमेझॉन व Mi.com वर ऑनलाइन मिळेल. याशिवाय मी होम्स, मी स्टुडियोज आणि मी स्टोर्स पर ऑफलाइनही उपलब्ध होईल. हँडसेटचा पहिला सेल 22 दिसंबरला दुपारी 12 वाजता सुरू होईल.

Redmi 9 Power : वैशिष्ट्ये

ड्यूल-सिमचा रेडमी 9 पावर अँड्रॉइड 10 बेस्ड MIUI 12 वर आधारित आहे. फोन मध्ये 6.53 इंच फुल एचडी+ डॉट ड्रॉप स्क्रिन आहे. स्क्रिनचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिली आहे. हैंडसेट मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, अड्रेनो 610 जीपीयू आहे फोन मध्ये 4 जीबी रॅम आहे. फोन 64 जीबी व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेजसह येतो. स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड वापरून 512 जीबी पर्यंत वाढविता येते.

रेडमी 9 पावर में 48 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर दिले आहेत. रेडमी नोट 4जी मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला होता. रेडमीच्या या फोनमध्ये पुढल्या बाजूला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे जो आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI) फेस अनलॉक सपोर्ट करतो.

कनेक्टिविटीसाठी रेडमी 9 पावर मध्ये 4जी विओएलटीई, ड्यूल-बँड वाई-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड ब्लास्टर, युएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक दिला आहे. फोन स्टिरियो स्पीकर्ससह येतो. जो हाय-रिझोल्युशन ऑडियो सर्टिफाइड आहे. शाओमीने रेडमी 9 पावर मध्ये कोपऱ्यात फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. फोन एक्सीलेरोमीटर, एम्बियंट लाइट, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसरसह येतो. हँडसेट मध्ये 6000mAh बॅटरी आहे जी 18वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

रेडमी 9 पावर रिव्हर्स वायर्ड चार्जिंग सपोर्ट करतो आणि यात इनहॅन्स्ड लाइफस्पॅन बॅटरी (ELB) टेक्नॉलजी दिली आहे. या हँडसेटचे का डायमेंशन 162.3×77.3×9.6 मिलीमीटर आणि वजन 198 ग्रॅम आहे.