Redmi K30 5G च्या किंमतीत मोठी घट; 7500 रुपयांची मिळणार सूट

शाओमीने गेल्या वर्षी फ्लॅगशीप डिव्हाइस Redmi K20 Pro लाँच केलं होतं आणि वर्षाअखेरीस याचे अपग्रेड व्हर्जनही कंपनीने आणलं होतं. सध्या या डिव्हाइसच्या किंमतीत सर्वात मोठी घट झाली असून ती मर्यादित वेळेसाठीच असणार आहे.

मुंबई : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाओमीने आपल्या रेडमी या उप उत्पादकासोबत नवीन फ्लॅगशीप Redmi K30 5G लाँच केला होता. कंपनीने पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेल्या या फोनला Redmi K20 Pro अपग्रेड व्हर्जन म्हणून लाँच केला होता. आता याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

शाओमीचा हा फोन काही वेरियंटमध्ये मार्केटमध्ये दाखल झाला आहे. मर्यादित वेळेसाठी याच्या किंमतीत 101 डॉलर (जवळपास 7,500 रुपये) इतकी घट झाली आहे.  हे डिव्हाइस होम कंट्री चीनमध्ये 6GB+128GB, 8GB+128GB आणि 8GB+256GB स्टोरेज वेरियंट्समध्ये खरेदी करता येणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये या फोनच्या मूळ किंमतीत कायमस्वरुपी घट झाली होती.

Redmi K30 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसरसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. या चिपमध्ये दिलेले 5G मॉडेम इंटीग्रेशनमुळे हा 5G कनेक्टिविटी ऑफर करतो. याच्या मदतीने 40 टक्के उत्तम ग्राफिक्स परफॉर्मन्स आणि 100 टक्के चांगली AI कंप्युटिंग पावर मिळते. हा फोन ड्युअल मोड 5G ला सपोर्ट करतो.

गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनही मिळणार

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बाबत सांगायचं झालं तर या फोनमध्ये 6.67 इंचाचा ड्युअल होल फुल-स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि स्क्रीन -टू-बॉडी रेशियो 91 टक्के आहे. या डिस्प्ले आय प्रोटेक्शन मोड 2.0 सह येतो. 3D फोर-कर्व्ड डिझाइनसह येणाऱ्या फोनच्या बॉडीवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शनही दिलं आहे.

64MP क्वॉड कॅमरा सेटअप

यात AI ड्युल-फ्रंट-कॅमरा 20MP+2MP सेंसरसह दिला आहे. रिअर पॅनलवर फोनमध्ये  64 मेगापिक्सलचा मुख्य सेंसर दिला आहे. सोबतच 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. यात 4500mAhची बॅटरी दिली आहे, जी 30W फास्ट चार्जिंगसह येते.