Xiaomi रेडमी नोट ९ सीरीज फोनमध्ये झालीये ही गडबड; जाणून घ्या

शाओमीची उपकंपनी कंपनी रेडमीच्या सर्वच फोनला भारतात नेहमी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण, आता शाओमीच्या Redmi Note 9, Note 9 Pro आणि Note 9S च्या फोनमध्ये काहीतरी गडबड झाली असल्याचे समोर आहे.

मुंबई : शाओमी तर्फे यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Redmi Note 9 सीरीजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेडमीचे स्मार्टफोन्स नेहमीच अनेकांच्या पसंतीस उतरले आहेत, पण आता Redmi Note 9, Note 9 Pro आणि Note 9S च्या खूप साऱ्या युजर्संना त्रास होत आहे. याचे कारण, म्हणजे नवीन लाइनअपच्या कॅमेऱ्यात धूळ जात आहे. त्यामुळे याचा परिणाम कॅमेऱ्याच्या परफॉर्मन्सवर होत आहे. हार्डवेअरमध्ये कमतरता असल्याने हा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कॅमेऱ्यात कमतरता येत होत्या. पण, याकडे जास्त लोकांचे लक्ष गेले नाही. परंतु, वेगाने वाढत असल्याने सर्व युजर्संना याचा त्रास होत आहे. या डिव्हाईसेजच्या कॅमेरा लेन्सच्या आत धुळीचे कण जात आहेत. युजर्सच्या तक्रारीनंतर कॅमेरा एअरटाइट नसल्याने मॉड्युलच्या आतमध्ये कॅमेरा सेन्सरवर धूळ जमा होत आहे.

समोर आले अनेक फोटो

यूजर्सकडून सोशल मीडियावर आपल्या फोनच्या इमेजेस शेअर करण्यात आल्या आहेत. ज्यात कॅमेरा मॉड्युलच्या आतमध्ये धुळीचे कण दिसत आहेत. समोर आलेली अडचण ही हार्डवेयर संबंधित क्वॉलिटी कंट्रोलची आहे. ज्यात युजर्संना अडचण येत आहे. ते कंपनीकडे रिप्लेसमेंटची मागणी करीत आहेत. एमआय कम्युनिटी या एका फेमस मॉडरेटरकडून रिप्लेसमेंट करण्याची सूचना करण्यात आलेली आहे.

अधिकृत म्हणंण (स्टेटमेंट) आले नाही

जर तुमच्याकडे Redmi Note 9, Note 9S आणि Note 9 Pro Max यापैकी एखादा फोन आहे. तसेच या फोनमध्ये धूळ जात असल्यास त्यासाठी रिटेलरकडे जाणे गरजेचे आहे. या बदल्यात युजर्संना रिप्लेसमेंट मिळणे आवश्यक आहे.