Reliance Jio: 252GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंगवाले ढासू प्लान, 84 दिवस मिळणार वैधता

रिलायन्स जिओ आपल्या युजर्सला 84 दिवस वैधता असलेले अनेक आकर्षक प्लान ऑफर करत आहे. प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिटसह 252 जीबी पर्यंत डेटाचा फायदा मिळणार आहे. हे सर्व प्लान 1 हजार रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

मुंबई : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या युजर्सला अनेक आकर्षक प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. तर दरवाढ झाल्यानंतर युजर्सचा कल अशा प्लान्सकडे वाढाला आहे ज्याची वैधता अधिक आहे. म्हणून आपल्याला जिओचे काही बेल्ट प्लान बाबत सांगणार आहोत, जे एकदा रिचार्ज केल्यानंतर ८४ दिवस वैध आहेत. या प्लानचे वैशिष्ट्य असे की, यात अनलिमिटेड कॉलिंग आणि 252GB पर्यंत डेटा ऑफर करण्यात येत आहे.

रिलायन्स जिओचा 555 रुपयांचा प्लान

84 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या जिओच्या या प्लानमध्ये आपल्याला रोज 1.5 जीबी याप्रमाणे एकूण 126जीबी पर्यंत डेटा मिळतो. प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. दररोज 100 फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 3 हजार FUP मिनट्स मिळणार आहेत. प्लानची खासियत ही आहे की, यात जिओ ॲप्सचे सब्सक्रिप्शिनही मिळते.

रिलायन्स जिओचा 599 रुपयांचा प्लान

प्लानमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह एकूण 168जीबी डेटा ऑफर करण्यात येत आहे. हा डेटा दररोज  2जीबी याप्रमाणे आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट केला जाईल. या प्लानमध्ये जिओ-टू-जिओ कॉलिंग फ्री आहे, अन्य नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये 555 रुपयांच्या प्लानप्रमाणे 3 हजार FUP मिनट्स मिळतात. दररोज 100 फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते.

रिलायन्स जिओचा 999 रुपयांचा प्लान

जिओच्या 84 दिवस चालणाऱ्या या प्लानमध्ये आपल्याला रोज 3 जीबी याप्रमाणे एकूण 252जीबी डेटा मिळतो. इतर प्लानप्रमाणेच यात जिओ नेटवर्क्ससाठी फ्री कॉलिंग आणि दुसऱ्या नेटवर्कसाठी 3 हजार FUP मिनट्स देण्यात येत आहेत. प्लानमध्ये दररोज 100 फ्री एसएमएससह सर्व जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते.