जिओची धमाल ऑफर, 141 रुपयांत मिळणार JioPhone 2

रिलायन्स जिओने आपल्या फीचर फोन ग्राहकांसाठी एक नवी ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनीचा Jio Phone 2 ग्राहकांना १४१ रुपये प्रति महिना याप्रमाणे हफ्त्यांवर खरेदी करता येणार आहे. या 4जी फोनची मूळ किंमत 2999 रुपये आहे.

मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड प्लान आणत असते पण आता कंपनीने आपल्या फीचर फोन ग्राहकांसाठी एक ऑफर आणली आहे. कंपनीच्या या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना 141 रुपये प्रतिमहिना याप्रमाणे सुलभ हफ्त्यांमध्ये रिलायन्स जिओचा फीचर फोन JioPhone 2 खरेदी करता येणार आहे. ही एक ईएमआय स्कीम आहे, याची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर दिली आहे.

काय आहे ऑफर

जिओफोन 2 फीचर फोनची मूळ किंमत 2999 रुपये आहे, पण ईएमआय ऑफर अंतर्गत हा फोन ₹ 141.17 रुपये प्रति महिना अशा सुलभ हफ्त्यात खरेदी करता येणार आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ऑफरचा लाभ फक्त क्रेडिटकार्ड धारकांनाच घेता येणार आहे. ग्राहकांना हा फोन कंपनीची अधिकृत वेबसाइट Jio.com वरून खरेदी करता येणार आहे. फोन खरेदी करण्यासाठी पिनकोड नमूद करून फोनची उपलब्धता चेक करता येईल. डिलेव्हरी चार्ज 99 रुपये आकारण्यात येईल.

ही आहे फोनची खासियत

हा एक 4जी फीचर फोन आहे. ज्यात HD व्हॉइस कॉलिंग, फास्ट 4जी स्पीड, एंटरटेनमेंट अॅप्सचा सपोर्ट मिळणार आहे. या ड्युअल सिम फोनमध्ये 2.4 इंचाचा QVGA TFT डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 2000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15 दिवस स्टँडबाय मोडवर चालते. संगीत आणि व्हिडिओजसाठी यात 128 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्ड वापरता येणार आहे. यात  qwerty किपॅड,3.5mm हेडफोन जॅक, एफएम रेडिओ आणि टॉर्च लाइटही दिली आहे.

कॅमेरा फीचर फोन

फोनमध्ये फोटोग्राफी शौकिनांसाठी कॅमेराही दिला आहे. यात रिअरला 2 मेगापिक्सल कॅमेरा आणि फ्रंटला 0.3 मेगापिक्सल VGA फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 512MB रॅम आणि  4GB इंटर्नल स्टोरेज दिलं आहे. 24 भाषांना सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये व्हॉइस कमांड सपोर्ट आणि व्हॉइस असिस्टंटसाठी स्वतंत्र बटण दिलं आहे.