‘पबजी'(PUBG) वरील बंदी हटविणार? कोरियन कंपनीने घेतला ताबा

दिल्ली : तसे पाहता मुख्य पबजी गेम(PUBG Game) दक्षिण कोरिया(South Korea)च्या पबजी कॉर्पोरेशन'(PUBG Corporation) ने डेव्हलप केला आहे. पण, भारत (India) आणि चीन (China) मध्ये चीनची कंपनी टेन्सेंट गेम्स (Tencent Games) ‘पबजी मोबाइल’ ((PUBG Mobile) आणि ‘पबजी मोबाइल लाइट’ (PUBG Mobile Lite) या दोन गेम्सचे ऑपरेशन्स बघते. पण, भारताने बंदी घातल्यानंतर आता पबजी कॉर्पोरेशनने टेन्सेंट गेम्सकडून भारतातील हक्क काढून घेतले आहेत. त्यामुळे आता लोकप्रिय बॅटल गेम ‘पबजी’ पुन्हा एकदा भारतात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारत सरकारने पबजीसह ११८ चीनी ॲप्सवर बंदी घातल्याच्या काही दिवसांनंतर पबजी कॉर्पोरेशनने चीनच्या ‘टेन्सेंट गेम्स’ला पबजी मोबाइल गेमची भारतातील फ्रेंचाईझी न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्राने दिली.

कंपनी करणार सरकारसोबत चर्चा (company will discuss with the government)

टेन्सेंट गेम्सकडे आता भारतातील पबजी मोबाइल गेम हातळण्याची जबाबदारी नसेल. गेमची सर्व जबाबदारी आता पबजी कॉर्पोरेशनकडेच असेल अशी घोषणा दक्षिण कोरियाच्या कंपनीने केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही पूर्ण आदर करतो, खेळाडूंच्या डेटा सुरक्षेला कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारतीय कायद्यांचे आणि नियमांचे पूर्णपणे पालन करत गेमर्सना पुन्हा एकदा हा गेम खेळता यावा यासाठी भारत सरकारबरोबर चर्चा करून उपाय काढण्याची अपेक्षा आहे असे कंपनीने म्हटले आहे.

मूळ गेम अद्यापही सुरूच

दरम्यान यामुळे भारतातील पबजीवरील बंदी लवकरच हटवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत पबजी मोबाइल आणि पबजी मोबाइल लाइट यांचा उल्लेख आहे म्हणजेच केंद्र सरकारने दक्षिण कोरियाच्या नाही तर चीनी कंपनीचा संबंध असणाऱ्या पबजी मोबाइल आणि पबजी मोबाइल लाइट यांच्यावर बंदी आणली आहे. पण, मूळ पबजी गेम जो कंप्युटरवर खेळला जातो, तो दक्षिण कोरियाचा असून अजूनही भारतात तो सुरूच आहे. टेन्सेंटकडून भारतातील फ्रेंचाईझी काढून घेतल्यानंतर 'पबजी मोबाइल गेम'चाही संबंध चीनशी राहणार नाही.