रॉयल एनफिल्डची नवी दमदार बाईक येतेय

रॉयल एनफिल्डची लवकरच नवीन बाईक येत आहे. आता Royal Enfield Meteor 350 च्या व्हेरियंट्स आणि कलर डिटेल्स लीक झाली आहेत.

मुंबई : रॉयल एनफिल्डची लवकरच नवीन बाईक येत आहे. रॉयल एनफील्ड आपली नेक्स्ट जनरेशन UCE350 लाइन-अपला पुढील महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. याची सुरुवात Meteor 350 बाईकपासून सुरू होणार आहे. रॉयल एनफिल्डची बाईक सातत्याने चर्चेत आहे. याची लीक्ड इमेज सुद्धा समोर आली आहे. आता Royal Enfield Meteor 350 ची व्हेरियंट्स आणि कलर डिटेल्स लीक झाली आहे.

३ व्हेरियंट्स आणि ७ कलरमध्ये येणार बाईक

रॉयल एनफिल्ड Meteor 350 बाईक, बंद झालेल्या BS4 थंडरबर्ड आणि थंडरबर्ड X350 ची रिप्लेसमेंट असणार आहे. Meteor 350 ही नवीन प्लॅटफॉर्मवर तयार झाली आहे. यात नवीन एअर कुल्ड इंजिन असणार आहे. Rushlane ने या दमदार बाईकचे लीक्ड ब्रॉशर पब्लिश केले आहे. अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, ही मोटर सायकल फायरबॉल यलो, फायरबॉल रेड, स्टेलर रेड मॅटेलिक, स्टेलर ब्लॅक मॅट, स्टेलर ब्लू मॅटेलिक, सुपरनोवा ब्राउन ड्युल-टोन आणि सुपरनोवा ब्लू ड्युल-टोन या ७ कलर स्कीममध्ये येणार आहे.

बाईकची खास वैशिष्ट्ये

Fireball या बाईकची एन्ट्री लेवल व्हेरियंट आहे. तर Supernova याची टॉप एन्ड व्हेरियंट आहे. बाईकच्या प्रत्येक व्हेरियंटमध्ये काही ना काही युनिक फीचर्स दिले आहेत. फायरबॉल व्हेरियंट ट्रिपर नेविगेटर, ब्लॅक कंपोनेंट्स, सिंगल कलर टँक, डीकॅलसह ग्राफिक्स, कलर्ड रिम टेप आणि ब्लॅक इंजनसह येतो. तर, Stellar व्हेरियंट बॉडी कलर्ड कंपोन्ट्स, प्रिमिअम बॅज, क्रोम एग्जस्ट सिस्टम, क्रोम हँडलबार, क्रोम EFI कवर आणि बॅकरेस्ट सोबत येईल.

बाईकमध्ये असेल नवीन UCE 350 इंजिन

Supernova व्हेरियंट प्रीमियम ड्युल टोन पेंट प्रिमिअम सीट फिनिश, विंडस्क्रीन आणि क्रोम इंडिकेटर्स सोबत येऊ शकतात. ट्रिपर नेव्हीगेशन एक सेमी डिजिटल ड्युल पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. रॉयल एनफिल्ड मोटरसायकल मध्ये पहिल्यांदा ब्लूटूथ कनेक्टिविटी घेऊन आली आहे. हे फीचर सर्व व्हेरियंट्साठी स्टँडर्ड रुपात देण्यात आले आहे. Meteor 350 बाईक नवीन UCE 350 इंजिनसोबत येते. रॉयल एनफिल्ड Meteor 350 मध्ये 5 स्पीड ट्रान्समिशन मिळू शकतो.