Samsung Introduces New Range of Larger and Better Curd Maestro Refrigerator
Samsung Curd Maestro Refrigerator

मुंबई : सॅमसंग (Samsung) या भारताच्‍या सर्वात मोठ्या व सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज उच्‍च स्‍टोरेज क्षमता असलेले रेफ्रिजरेटर्स ग्राहक खरेदी करू पाहत असताना त्‍यांचे अत्‍यंत लोकप्रिय ठरलेल्या कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर्सचे (Curd Maestro Refrigerator) मोठ्या क्षमतांमधील चार नवीन मॉडेल्‍स सादर केले.

कर्ड माएस्‍ट्रो™ हे दही बनवू शकणारे जगातील पहिले रेफ्रिजरेटर्स आता ३८६ लिटर व ४०७ लिटर क्षमतांमध्‍ये उपलब्‍ध असणार आहेत आणि यामध्‍ये कन्‍वर्टिबल ५-इन-१ तंत्रज्ञान, ट्विन कूलिंग प्‍लस™, डिजिटल इन्‍वर्टर तंत्रज्ञान आणि स्‍टेबिलायझर फ्री ऑपरेशन असे सॅमसंगचे प्रमुख नाविन्यपूर्ण घटक आहेत. हे घटक रेफ्रिजरेटर्सना ऊर्जा कार्यक्षम बनवतात.

डबल डोअर फ्रॉस्‍ट फ्री कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर्सच्‍या नवीन मॉडेल्‍समध्‍ये स्‍टेनलेस स्टील कर्ड कंटेनर देखील आहे. रेफ्रिजरेटर्सची कर्ड माएस्‍ट्रो™ रेंज सॅमसंगच्‍या ‘मेक फॉर इंडिया’ नाविन्‍यतांचा भाग आहे आणि कंपनीला वर्षानुवर्षे भारतीय ग्राहकांच्‍या गरजांबाबत असलेल्‍या सखोल माहितीमधून ही रेंज तयार करण्‍यात आली आहे. हे रेफ्रिजरेटर्स दही बनवण्‍याच्‍या त्रासाला दूर करतात आणि फूड प्रीझर्व्‍हेशनपासून फूड प्रीपरेशनपर्यंत रेफ्रिजरेटरच्‍या पारंपारिक वापरामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर्समधील दही बनवण्‍याच्‍या प्रक्रियेला कर्नाल येथील आयसीएआर- नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (एनडीआरआय)ची मान्‍यता मिळाली आहे.

”सॅमसंगमध्‍ये आमचा लोकांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणा-या अर्थपूर्ण नाविन्‍यतांवर विश्‍वास आहे. आमच्‍या कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर्सना ग्राहकांकडून अत्‍यंत सकारात्‍मक प्रतिसाद मिळाला आहे. ज्‍यामुळे फ्रॉस्‍ट फ्री रेफ्रिजरेटर्समधील आमच्‍या बाजारपेठ हिस्‍सामध्‍ये प्रबळ वाढ झाली आहे. आम्‍हाला आमच्‍या रेफ्रिजरेटर्सचे उच्‍च क्षमतेचे मॉडेल्‍स निर्माण करण्‍यासाठी सतत मागणी करण्‍यात येत आहे. ग्राहकांची वाजवी दरामध्‍ये अधिक स्‍टोरेज क्षमता असलेले रेफ्रिजरेटर्स खरेदी करण्‍याची इच्‍छा आहे.

ग्राहकांच्‍या बदलत्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आम्‍ही कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर्सचे चार नवीन मॉडेल्‍स सादर करत आहोत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आम्‍ही भारतातील रेफ्रिजरेटर विभागामधील आमचे अग्रणी स्‍थान अधिक प्रबळ करू,” असे सॅमसंग इंडियाच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्‍यवसायाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष राजू पुल्‍लन म्‍हणाले.

किंमत, ऑफर्स व उपलब्‍धता

सॅमसंगचे कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर्स मॉडेल्‍स विद्यमान २४४ लिटर, २६५ लिटर, ३१४ लिटर व ३३६ लिटर क्षमतांव्‍यतिरिक्‍त आता ३८६ लिटर व ४०७ लिटर क्षमतांमध्‍ये उपलब्‍ध असतील. नवीन मॉडेल्‍स १० सप्‍टेंबर २०२०पासून सर्व रिटेल माध्‍यमांमध्‍ये आणि सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्‍टोअर ‘सॅमसंग शॉप’वर रिफाइन्‍ड आयनॉक्‍स व ल्‍यूक्‍स ब्राऊन या दोन रंगांच्‍या व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असतील.

चार नवीन मॉडेल्‍स २-स्‍टार व ३-स्‍टार रेटिंग पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असतील. ३८६ लिटर क्षमतेच्‍या व्‍हेरिएण्‍टची किंमत २-स्‍टार मॉडेलसाठी ५५,९९० रूपये आणि ३-स्‍टार मॉडेलसाठी ५६,९९० रूपये असेल. तसेच ४०७ लिटर क्षमतेच्‍या व्‍हेरिएण्‍टची किंमत २-स्‍टार मॉडेलसाठी ६१,९९० रूपये आणि ३-स्‍टार मॉडेलसाठी ६३,९९० रूपये असेल.

कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर्स खरेदी केल्‍यानंतर ग्राहक मर्यादित कालावधीच्‍या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात, जसे जवळपास १५ टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक, एका ईएमआयमध्‍ये सूट आणि ९९० रूपये इतक्‍या कमी हप्‍त्‍यामध्‍ये ईएमआयची सुरूवात.

कर्ड माएस्‍ट्रो™: प्रत्‍येक घरासाठी नाविन्‍यता

कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर्स अधिक फूड स्‍टोरेज व फूड प्रीझर्व्‍हेशनसह भारतात पारंपारिक रेफ्रिजरेटर स्थितीला नवीन स्‍तरावर घेऊन जातात. कर्ड माएस्‍ट्रो™ जटिल, वेळ लागणा-या व अवघड असलेल्‍या दही बनवण्‍याच्‍या समस्‍यांचे निराकरण करतो. दही हा भारतीय घरांमधील आवश्‍यक पदार्थ आहे.

कर्ड माएस्‍ट्रो™ चा वापर करताना दूध उकळवून थंड करावे आणि त्‍यामध्‍ये दही तयार करण्‍यासाठी लागणारे घटक मिश्रित करावे. कर्ड माएस्‍ट्रो™ सर्वात महत्त्वाचे काम म्‍हणजे किण्‍वन प्रक्रियेचे काम करतो. तो दहीचे किण्‍वन करण्‍यासह स्‍टोअर देखील करेल. कर्ड माएस्‍ट्रो™ प्रत्‍येकवेळी त्‍याच प्रक्रियेने दही बनवतो आणि विविध वातावरणीय स्थितींमध्‍ये दही बनवण्‍याच्‍या समस्‍यांचे निराकरण करतो. कर्ड माएस्‍ट्रो™ ६.५ ते ७.५ तासांमध्‍ये दही तयार करतो – फिकट दह्यासाठी ६.५ तास आणि घट्ट दहीसाठी ७.५ तास वेळ लागतो.

कन्‍वर्टिबल ५-इन-१ रेफ्रिजरेटर

कर्ड माएस्‍ट्रो™ रेफ्रिजरेटर्समधील कन्‍वर्टिबल ५-इन-१ ट्विन तंत्रज्ञान नॉर्मल, सीझनल, एक्‍स्‍ट्रा शॉपिंग, वेकेशन आणि होम अलोन या पाच मोड्समध्‍ये येते. हे मोड्स तुमच्‍या सर्व रेफ्रिजरेशन गरजांची काळजी घेतात. कन्‍वर्जन मोड्स विविध स्‍टोरेज गरजांसाठी परिपूर्ण सोल्‍यूशन असून प्रत्‍येक मोड वीजेची बचत देखील करते.

ट्विन कूलिंग प्‍लस™

ट्विन कूलिंग प्‍लस™ तंत्रज्ञान स्‍वतंत्र कूलिंग यंत्रणेप्रमाणे कार्य करते. फ्रिज व फ्रिजरमधील स्‍वतंत्र हवाप्रवाह फ्रिज व फ्रिजरदरम्‍यान असलेल्‍या पदार्थांमधून नकोसा वाटणारा वास येण्‍याला प्रतिबंध करते. दोन एव्‍हापोरेटर्स तापमानामधील चढ-उतार कमी करण्‍यासाठी आणि जवळपास ७० टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रता पातळी ठेवण्‍यासाठी फ्रिज व फ्रिजर जागेवर स्‍वतंत्रपणे नियंत्रण ठेवतात. ज्‍यामुळे पदार्थ दीर्घकाळापर्यंत ताजी राहतात आणि पदार्थांचा अपव्‍यय कमी होतो.

डिजिटल इन्‍वर्टर तंत्रज्ञान

डिजिटल इन्‍वर्टर तंत्रज्ञान ऊर्जा कार्यक्षमता व कमी आवाजासह उत्तम कामगिरीची खात्री देते. डिजिटल इन्‍वर्टर कम्‍प्रेसर १० वर्षाच्‍या वॉरण्‍टीसह येते आणि जर्मनीमधील असोसिएशन फॉर इलेक्ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक ॲण्‍ड इन्‍फॉर्मेशन टेक्‍नोलॉजीजने (व्‍हर्ब ॲण्‍ड डॉश्‍चर इलेक्‍ट्रोटेक्निकर – व्‍हीडीई) २१ वर्षापर्यंत कम्‍प्रेसर टिकून राहण्‍यासंदर्भात प्रमाणन देखील दिले आहे.

स्‍टेबिलायझर फ्री ऑपरेशन

हे वैशिष्‍ट्य रेफ्रिजरेटरचे वीजेमधील चढ-उतारापासून संरक्षण करते (स्‍टेबिलायझर फ्री ऑपरेशन रेंज: १०० ते ३०० व्‍हॉल्‍ट). स्‍टेबिलायझर फ्री ऑपरेशन रेफ्रिजरेटर स्थिरपणे व विश्‍वसनीयरित्‍या कार्यरत राहण्‍याची खात्री देते. विद्युतदाब वाढला तर हे वैशिष्‍ट्य आपोआपपणे वीजपुरवठा खंडित करते आणि कोणत्‍याही प्रकारच्‍या विद्युत नुकसानाला प्रतिबंध करते.