Samsung चा ढासू 5G लॅपटॉप येतोय, याच वर्षी होणार लाँच

सॅमसंग यावर्षी ऑक्टोबरमध्ये आपला 5G लॅपटॉप Galaxy Book Flex लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने या लॅपटॉपसाठी अलीकडेच ट्रेडमार्क फाइल केला आहे. लाँच झाल्यानंतर याची थेट टक्कर लेनोवो फ्लेक्स 5G सोबत असणार आहे.

मुंबई : सॅमसंग या वर्षी वेगाने आपले नवीन डिव्हाइस लाँच करत आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनी आता Galaxy Book Flex 5G लॅपटॉप लाँच कण्याच्या तयारीत आहे. कंपनी हा लॅपटॉप ऑक्टोबरमध्ये Galaxy Z Fold 2 सोबत लाँच करण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे. लेट्स गो डिजिटलच्या एका वृत्तानुसार सॅमसंग गॅलेक्सी बुक फ्लेक्स 5G साठी ट्रेडमार्क अर्जही देण्यात आला आहे. यानंतर आता हे निश्चित आहे की, कंपनी हा 5G वेरियंट मध्ये लाँच करणार आहे.

दुसऱ्या कंपनीने दाखल केला ट्रेडमार्क

ट्रेडमार्क सॅमसंग ऐवजी Abril Abogados नावाच्या कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आला आहे. जुलै 2019 मध्ये Galaxy Ax1 साठी याच कंपनीने ट्रेडमार्क दाखल केला होता. अनेकदा ट्रेडमार्क फायलिंगमध्ये प्रोडक्टचे नाव गॅलेक्सी शब्दाने सुरू होत नाही.

असं याआधीही अनेकदा झालं आहे की, गॅलेक्सी पोडक्टच्या ट्रेडमार्क फायलिंगमध्ये कीवर्ड समाविष्ट नव्हते. अशातच नवीन बुक फ्लेक्सला ‘Samsung Galaxy Book Flex 5G’ नावाने लाँच करणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही.

लेनोवोनेही सादर केला आहे 5G लॅपटॉप

ओरिजनल गॅलेक्सी बुक फ्लेक्स बाबत सांगायचं झालं तर ऑक्टोबर 2019 मध्ये Galaxy Book Ion सोबत लाँच झाला होता. हे जगातील पहिले लॅपटॉप होते जे QLED डिस्प्लेसह आले होते. यानंतर कंपनीने CES 2020 मध्ये Galaxy Book Alpha सीरीजमध्ये अन्य मॉडेल्सही सादर केले होते. गॅलेक्सी बुकची जगातील पहिल्या 5G लॅपटॉमध्ये गणना होणार नाही. यापूर्वी लेनोवो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8cx प्रोसेसरसह लेनोवो फ्लेक्स 5G लॅपटॉप सादर करण्यात आला आहे.