भारतात खूपच लोकप्रिय होतंय Triller शॉर्ट व्हिडियो ॲप, अनेक सेलिब्रिटी आहेत याचे युजर

भारतात एक नवीन शॉर्ट व्हिडिओ-मेकिंग ॲप Triller खूपच लोकप्रिय होत आहे. गेल्या दीड महिन्यातच हे ॲप गुगल प्ले स्टोर आणि ॲपल ॲप स्टोरवर ४ कोटीहून अधिक डाउनलोड झालं आहे. भुवन बम, अरमान मलिक आवेज़ दरबार यासारख्या व्यक्ती या ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करण्यात आघाडीवर आहेत.

मुंबई : भारतात शॉर्ट व्हिडिओ ॲप TikTok बॅन झाल्यानंतर अशाप्रकारचे अन्य ॲप खूपच लोकप्रिय होत आहेत. लॉस अँजलिसचं सोशल व्हिडिओ ॲप Triller चाही यात समावेश झाला आहे. हे ॲप गेल्या दीड महिन्यात भारतात गुगल प्ले स्टोर आणि ॲपल ॲप स्टोरवर ४ कोटींहून अधिक डाउनलोड झालं आहे. हॉलिवूड निर्माते Ryan Kavanaugh आणि Sarnevesht ची कंपनी प्रॉक्सिमा मीडियाची मालकी हक्क असलेलं  ट्रिलर ॲप भारतात वेगाने लोकप्रिय होत आहे.     

युट्युब, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि अन्य ॲपला मागे टाकत Triller अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, आणि इटलीसह 50 मार्केटमध्ये सर्व ॲप स्टोर कॅटेगरीत अव्वल स्थान देण्यात आलं आहे असं ट्रिलरचे एग्जिक्युटिव्ह चेअरमन बॉबी सर्नेवेष्ठ यांनी ईटीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

काय आहे Triller: Social Video Platform

हे टिकटॉक प्रमाणेच शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ॲप आहे. याच्या माध्यमातून आपण अप्रतिम व्हिडिओ तयार करू शकता. यात युनिक ऑटो-एडिटिंग फीचर दिलं आहे. याशिवाय आपला व्हिडिओ अधिक आकर्षक होण्यासाठी यात 100हून अदिक फिल्टर्स, टेक्स्ट, ड्रॉइंग आणि इमोजीची सुविधा दिली आहे. याच्या लायब्ररीतून आपण टॉप-ट्रेंडिंग गाण्यांचा ॲक्सेसही करू शकतात. व्हिडिओ तयार केल्यानंतर काही सेकंदातच फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करू शकता.

मोठे-मोठे सेलिब्रिटी करतत वापर

या ॲपचे जगभरात ७ कोटी महिन्याला ॲक्टिव्ह युजर्स आणि २५ कोटी एकूण डाउनलोड्स आहेत. या महिन्याचा विचार करता 500 टक्के वाढ झाली आहे असं बॉबी यांनी नमूद केलं. ह्या ॲपचं माइक टायसन सारख्या सेलिब्रटीने समर्थन केलं आहे आणि स्नूप डॉग, लील वेन आणि द वीकेंड सारखे सिलिब्रिटी याचे भागीदार आहेत तर, भुवन बम, अरमान मलिक, टिकटॉक स्टार आवेज़ दरबार यासारख्या व्यक्ती या ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करण्यात आघाडीवर आहेत.