The wait is over! iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro iPhone Pro Max launch; How much is the price? How to book?

मोबाईल उत्पादन क्षेत्रात जगातील दिग्गज टेक कंपनी अॅपल आपला iPhone 13 हा फोन कधी लाँच करणार याची अनेकांना प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा अखेर संपली आहे. आयफोन १३ सीरिजचे चार फोन लाँच झाले आहेत. मंगळवारी रात्री उशीरा Apple Eventमध्ये हे फोन लाँच करण्यात आले. यासह Apple Watch Series 7, iPad Mini आणि iPad 2021 हे देखील या इव्हेंट मध्ये लाँच झाले.

  कॅलिफॉर्निया : मोबाईल उत्पादन क्षेत्रात जगातील दिग्गज टेक कंपनी अॅपल आपला iPhone 13 हा फोन कधी लाँच करणार याची अनेकांना प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा अखेर संपली आहे. आयफोन १३ सीरिजचे चार फोन लाँच झाले आहेत. मंगळवारी रात्री उशीरा Apple Eventमध्ये हे फोन लाँच करण्यात आले. यासह Apple Watch Series 7, iPad Mini आणि iPad 2021 हे देखील या इव्हेंट मध्ये लाँच झाले.

  अॅपलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपला iPhone 12 लाँच केला होता. त्याला मोबाईल प्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या पुढच्या मॉडेलबद्दल म्हणजे iPhone 13 बद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अॅपलच्या या नव्या मॉडेलचे लॉन्चिंग गेल्या वर्षीच्या तुलनेत एक महिना आधीच झाले आहे.  iPhone 13 सोबतच iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone Pro Max हे चार मॉडेल लाँच करण्यात आले आहेत

  आयफोन 13 सीरीजचे बेस्ट फिचर्स

  •  स्लीक डिझाईन, ऍडव्हान्स ड्युएल कॅमेरा सिस्टम
  • हा फोन गुलाबी, लाल, निळ्या, मिडनाईट, स्टारलाईट या पाच रंगांमध्ये उपलब्ध
  • 6 कोर CPU
  • आतापर्यंत कोणत्याही स्मार्टफोनमध्ये इतक्या पावरफुल क्षमतेचा सीपीयू देण्यात आलेला नाही.
  • 4 कोर जीपीयू. त्यामुळे ग्राफिक्स फास्ट होणार
  • १५.८ ट्रिलियन ऑपरेशन प्रति सेकंद क्षमता.
  • पॉवरफुल कॅमेरा सेटअप
  • ड्युएल रियर कॅमेरा
  • 12 MP वाईड आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सर. सिनेमॅटिक मोडची सुविधा.
  • ऑटोमॅटिक फोकस बदलण्याची सुविधा
  • आधीच्या तुलनेत दमदार बॅटरी.
  • आयफोन 13 मिनीची किंमत 699 डॉलर
  • आयफोन 13 ची किंमत 799 डॉल
  • आयफोन 13 प्रो ची किंमत 999 डॉलर
  • आयफोन १३ प्रो मॅक्सची किंमत 1099 डॉलर
  • आयफोन 13 हा 128,256 आणि 512 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध
  • प्रो मॉडेल 4 फिनिशमध्ये उपलब्ध असेल.
  • आयफोन १३ प्रोमध्ये टेलिफोटो, वाईड आणि एक अन्य कॅमेरा सेन्सर दिला आहे.

  एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

  - संजय राऊत, खासदार, शिवसेना