The worlds first bionic eye
जगातील पहिला बायोनिक डोळा

  • आता अंधत्व दूर करणार
  • मेंदूत बसवण्याची तयारी

वृत्तसंस्था, मेलबर्न : ऑस्ट्रलियातील (Australia) मोनाश विद्यापीठातील (Monash University) संशोधकांनी अथक प्रयत्नांनंतर बायोनिक डोळा (Bionic eye) बनवला आहे. याद्वारे अंधत्व (Blindness) दूर होऊ शकेल. याची चाचणी (test) पूर्ण होऊ शकेल. आता हा माणसाच्या मेंदूत (human brain) बसवण्याची तयारी सुरू आहे. हा जगातील पहिला बायोनिक डोळा (First Bionic eye) असल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्यापीठाचे इलेक्ट्रिकल आणि कंप्युटर इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक लाओरी (Professor Laurie) यांनी सांगितले, आम्ही मेंदूच्या पृष्ठभागावर बसवता येईल अशी वायरलेस ट्रान्समीटर चिप विकसित केली आहे. आम्ही या चिपला बायोनिक आय असे नाव दिले आहे. यात कॅमेऱ्यासह एक हेडगिअर फिट केलेला आहे. जो आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर नजर ठेवू शकेल.

दहा वर्षांच्या परिश्रमानंतर संशोधनाला यश

या उपकरणाचा आकार ९ बाय ९ मिलिमीटर आहे. हा डोळा तयार करण्यासाठी १० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आहे. प्रा. लाओरींनुसार, बायोनिक डोळा माणसाचे अंधत्व कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल. जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तींमध्येही तो लावला येईल. संशोधकांनी हे उपकरण विकण्यासाठी निधीची मागणी केली आहे. या संशोधकांना गतवर्षी एक मिलियन डॉलर (सुमारे ७.३५ कोटी) देण्यात आले होते. मोनाश बायोमेडिसीन डिस्कव्हरी इंस्टिट्युटचे डॉ. यान वोंग यांनी सांगितले, संशोधनादरम्यान मेंढ्यांवर चाचणी घेण्यात आली. यात ७ उपकरणे मेंढ्यांना कुठलीही इजा न पोहोचवता ९ महिन्यांपर्यंत सक्रिय होती.