थॉमसनचा अँड्रॉइड टीव्ही लाँच, किंमत १०,९९९ रुपयांपासून सुरू

थॉमसनने आपल्या अँड्रॉइड टीव्ही सीरीजची नवी रेंज सादर केली आहे. नवीन थॉमसन टीव्हीची किंमत 10,999 पासून सुरू होणार आहे.

मुंबई : Thomson ने अलीकडेच 4K रिझोल्युशन आणि HDR सपोर्टसह OATH सीरीजचे अँड्रॉइड टीव्ही लाँच केले होते. आता गुरुवारी थॉमसनने 10,999 रुपयांपासून सुरू होणाऱ्या नवीन टीव्हीची रेंज सादर केली. थॉमसनचे नवीन टीव्हीही अँड्रॉइडसह येतात आणि ते 32 इंचापासून ते ५५ इंच अशा प्रकारात उपलब्ध आहेत. यासोबतच कंपनीने OATH लाइनअपमध्ये 75 इंच टीव्हीही लाँच केला आहे.

THOMSON PATH 9A आणि 9R TV: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

थॉमसनचे Path लाइनअपचे टीव्ही  9A आणि 9R अशा दोन रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. 9A एचडी रेडी आणि फुलएचडी टीव्ही आहेत तर 9R हा 4K टीव्ही आहे. 9A मध्ये कंपनीने 32 इंच एचडी Path, 32 इंच एचडी बेजल-लेस, 40 इंच फुलएचडी आणि 43 इंच फुल एचडी यांचा समावेश आहे. तर 9R रेंज मध्ये 43 इंच 4K Path, 50 इंच 4K Path आणि 55 इंच 4K Path टीव्ही लाँच केले आहेत.

थॉमसनची 9A आणि 9R सीरीज अँड्रॉइड 9 वर चालते म्हणजेच युजर्सला प्ले स्टोरचा ॲक्सेस मिळणार आहे. टीव्हीत क्रोमकास्ट बिल्ट-इन आहे आणि स्ट्रीमिंग सर्व्हिसेसचाही मननुराद आनंद घेता येणार आहे. टीव्हीच्या उत्तम वाइड व्यूइंग अँगलसाठी एक IPS पॅनल दिलं आहे. 4K रिझोल्युशनवाले 9R टीव्ही HDR सपोर्टसह येतात.

थॉमसनच्या या टेलिव्हिजनमध्ये क्वाड-कोर 1 गीगाहर्ट्झ सीपीयू आणि ग्राफिक्ससाठी माली क्वाड-कोर जीपीयू दिला आहे. प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे रिमोटमध्ये सोनी लिव, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि युट्युब सारख्या ॲप्ससाठी वेगळी बटन्स दिली आहेत. नेविगेशनसाठी वॉइसचा वापर करता येऊ शकतो. रिमोट गुगल असिस्टंट सह येतो.

THOMSON PATH 9A AND 9R TV: किंमत आणि उपलब्धता

थॉमसन 9A आणि 9R सीरीज फ्लिपकार्ट पर 6 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.  9A सीरीजच्या 32 इंच एचडी Path ची किंमत 10,999 रुपये आहे. 32 इंच एचडी बेजल-लेस 11,499 रुपये, 40 इंच फुल एचडी आणि 43 इंच फुलएचडी टीवी 16,499 रुपये व 19,999 रुपयांना मिळणार आहे. 9R सीरीज मध्ये 43 इंच 4K Path ची किंमत 21,999 रुपये, 50 इंच 4K Path ची किंमत 25,999 रुपये आणि 55 इंच 4K Path टीव्ही 29,999 रुपयांचा आहे.

THOMSON OATH PRO TV: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

OATH सीरीजबाबत सांगायचं झालं तर थॉमसनने यापूर्वी 43 इंच, 55 इंच आणि 65 इंच स्क्रीन साइझ मध्ये टीव्ही लॉन्च केले आहेत. आता कंपनीने 50 इंच आणि 75 इंच स्क्रीन साइझचे टीव्ही आणले आहेत. या नव्या टीव्हीतही याआधी लाँच झालेल्या टीव्हीसारखेच स्पेसिफिकेशन्स आहेत.या टीव्हीत 4K सपोर्ट दिला आहे.याशिवाय HDR सोबतच डॉल्बी विजन सपोर्टही दिला आहे.  या टीव्हीत 2.4 गीगाहर्ट्झ वाय-फाय ओनली सपोर्ट आहे. वायर्ड कनेक्शनसाठी या टीव्हीत ईथरनेट सपोर्ट मिळणार आहे. या टीव्हीत स्क्रीन रिफ्रेश रेट 60 हर्ट्झ आहे.

या तिन्ही स्क्रीन साइझच्या टीव्हीत क्वाड-कोर प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-450 जीपीयू आहे. टीव्हीत 8 जीबी स्टोरेज असणार आहे. ऑडियोबाबत सांगायचं तर तिन्ही टीव्हीत DTS TruSurround, डॉल्बी डिजिटल प्लस आणि 15वॅटचे दोन स्पीकर्स दिले आहेत. म्हणजेच टोटल साउंट आउटपुट 30 वॅट आहे.

THOMSON OATH PRO TV: किंमत आणि उपलब्धता

50 आणि 75 इंच थॉमसन OATH टीव्हीची विक्री 6 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट वर शुरू होणार आहे. यांची किंमत अनुक्रमे 28,999 रुपये आणि 99,999 रुपये असणार आहे.