V! ने मुंबईमध्ये आपली गिगानेट 4G नेटवर्क क्षमता वाढवली

3G स्पेक्ट्रमचे रूपांतर 4G मध्ये करण्यात आल्यामुळे अधिक मजबूत झालेल्या 4G पायाभूत सुविधांमुळे वी गिगानेट 4G चे अधिक व्यापक कव्हरेज, नेटवर्क गुणवत्ता आणि अधिक जास्त प्रभावी ट्रॅफिक कॅरीएज क्षमता असे तिहेरी लाभ मिळणार आहेत.

  • शहरातील सर्व साईट्सवर ३जी स्पेक्ट्रमचे रूपांतर ४जीमध्ये करून सध्याची ४जी क्षमता अधिक मजबूत केली
  • एकूण ४जी बँडविड्थ वाढवण्यासाठी २१०० मेगाहर्ट्झचे ५ मेगाहर्ट्झ तैनात करण्यात आले आहे
  • ओकला®च्या निष्कर्षांनी सत्यापित केले आहे की, वी चे गिगानेट मुंबईमध्ये सर्वात वेगवान ४जी डाउनलोड आणि अपलोड स्पीड्स देते
  • मुंबईमध्ये वी ग्राहक आता अधिक क्षमतांच्या सुधारीत ४जी नेटवर्कचा आनंद घेऊ शकतात

मुंबई : वोडाफोन आयडिया लिमिटेडने मुंबईतील आपल्या सर्व साईट्सवर 3G स्पेक्ट्रम 4G मध्ये श्रेणीसुधारित केले आहे, त्यामुळे शहरामध्ये गिगानेट 4G च्या क्षमतेमध्ये भरीव वाढ झाली आहे. 2100 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम बँडचे 5 मेगाहर्ट्झ तैनात करण्यात आल्यानंतर लगेचच ही सुधारणा करण्यात आल्यामुळे मुंबईतील वी ग्राहकांना अधिक चांगल्या इनडोअर कव्हरेज बरोबरीनेच अधिक जास्त डाउनलोड आणि अपलोड स्पीड्सचा आनंद घेता येणार आहे.

3G स्पेक्ट्रमचे रूपांतर 4G मध्ये करण्यात आल्यामुळे अधिक मजबूत झालेल्या 4G पायाभूत सुविधांमुळे वी गिगानेट 4G चे अधिक व्यापक कव्हरेज, नेटवर्क गुणवत्ता आणि अधिक जास्त प्रभावी ट्रॅफिक कॅरीएज क्षमता असे तिहेरी लाभ मिळणार आहेत.

ब्रॉडबँड टेस्टिंग आणि वेबवर आधारीत नेटवर्क डायग्नोस्टिक ऍप्लिकेशन्समधील जागतिक पातळीवरील अग्रेसर ओकला®ने सत्यापित केले आहे की, वी चे गिगानेट हे डाउनलोड आणि अपलोड स्पीड्सच्या संदर्भात मुंबईतील सर्वाधिक सातत्यपूर्ण आणि सर्वाधिक वेगवान ४जी नेटवर्क आहे. आता मुंबईतील वी ग्राहकांना 4G हँडसेट आणि 4G सिम वापरत असताना अधिक वेगवान 4G अनुभवाचा आनंद घेता येणार आहे.

2020 मध्ये ग्राहकांच्या वागणुकीत आमूलाग्र बदल घडून आले आहेत. डेटासाठीची मागणी अनेक पटींनी वाढली असून आज डिजिटल समाजामध्ये टेलिकॉम नेटवर्क असणे अनिवार्य बनले आहे. यामुळे व्यापारी तसेच निवासी भागांमध्ये अतिशय वेगवान स्पीड असलेली मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणे अत्यंत आवश्यक आहे.

आधीच्या वोडाफोन आणि आयडिया नेटवर्क्सचे एकत्रीकरण, नुकतेच करण्यात आलेले 3G ते 4G स्पेक्ट्रम श्रेणीसुधारण यामुळे वोडाफोन आयडियाला सर्वाधिक उपलब्धता आणि उपयुक्तता लाभली आहे, त्यामुळे मुंबईतील टेक सॅव्ही ग्राहकांच्या आणि व्यवसायांच्या गरजा पूर्ण होणार आहेत.

आमच्या ग्राहकांच्या डेटाविषयीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, त्यांना सुधारीत 4G डेटा अनुभव देण्यासाठी आम्ही नेटवर्कमधील सुधारणांचा हा उपक्रम हाती घेतला आहे. 2100 मेगाहर्ट्झ स्तरावर विस्ताराबरोबरीनेच सध्याच्या 4G पायाभूत सुविधांमुळे डेटा स्पीडमध्ये वाढ झाली आहे, यामुळे मुंबईतील वी ग्राहकांना अधिक चांगला इनडोअर नेटवर्क अनुभव मिळणार आहे. आम्ही सर्व वी 3G ग्राहकांना अशी विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर जवळच्या रिटेल आउटलेटमध्ये जाऊन मोफत 4G सिम घ्यावे व वी गिगानेट 4G च्या संपूर्ण क्षमतांचा अनुभव घ्यावा.

राजेंद्र चौरासिया, वोडाफोन, आयडिया ऑपरेशन्स डायरेक्टर, मुंबई

वोडाफोन आयडिया मुंबईमध्ये आपल्या 2G सेवा देखील कायम ठेवणार आहे.