vivos v20 series smartphone will be launched on september 24 2020
Vivo विवोचा V20 SE स्मार्टफोन २४ सप्टेंबरला होणार लाँच

मुंबई : Vivo कंपनी Vivo V20 सीरिजचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी Vivo V20, Vivo V20 Pro आणि Vivo V20 SE स्मार्टफोन्स लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने अलीकडेच या सीरिजचा स्मार्टफोन Vivo V20 SE चा टीझर लाँच केला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच विवोचा Vivo V20 SE स्मार्टफोन मलेशियाच्या वेबसाइटवर प्रथम दिसल्याचे समोर आले आहे. हा स्मार्टफोन 24 सप्टेंबरला लाँच होणार आहे.

Vivo V20 SE ची वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनमध्ये युजर्सला पुढील गोष्टी मिळणार आहेत.
>> Snapdragon 665 चिपसेट
>> अँड्रॉइड 10 ला सपोर्ट करणार
>> CQC सर्टिफिकेशन जे 33 वॉटच्या फास्ट चार्जिंगसह येते.
>> स्मार्टफोनमध्ये 8जीबी रॅम असण्याची शक्यता आहे.
>> हा स्मार्टफोन Vivo V20 सीरिजचा सर्वात स्वस्त फोन असणार आहे.
>> स्मार्टफोन ग्रे, ब्लू पिंग ग्रेडिएंट रंगात उपलब्ध होईल.
>> फोनच्या अन्य वैशिषट्यांबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.