व्हॉट्सॲपमध्ये येतेय नवीन रिंगटोन

WhatsApp आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीचे अनेक नवीन फीचर्सवर काम सुरू आहे. व्हॉट्सॲपमधील रिंग टोन्स आणि साऊंडही नवीन आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. लवकरच युजर्संना नवीन रिंगटोन्स ऐकायला मिळू शकते.

नवी दिल्लीः मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप मध्ये खूप सारे नवीन फीचर्स येत आहेत. यात काही फीचर्सवर कंपनी खूप दिवसांपासून काम करत आहे. कंपनी काही देशात व्हॉट्सॲप पेमेंट्स सिस्टम तयार करत आहे. तसेच एक नवीन एक्सपिरियन्स मेसेजेस फीचरला टेस्ट करीत आहे. तसेच याशिवाय, लवकरच व्हॉट्सॲप कॉल टर्मिनेट केल्यास किंवा पुन्हा ग्रुप कॉल्स रिसिव्ह केल्याने नवीन टोन्स युजर्सना ऐकायला मिळणार आहेत.

व्हॉट्सॲप फीचर्स आणि अपडेट्सला ट्रॅक करण्यासाठी WABetaInfo च्या माहितीनुसार लेटेस्ट व्हॉट्सॲप व्हर्जन 2.20.100.22 बीटा फॉर आयफोन मधून नवीन फीचर्सची माहिती समोर आली आहे. ज्याची टेस्टिंग केली जात आहे. व्हॉट्सॲप पेमेंटला प्लॅटफॉर्म खूप आधीपासून टेस्ट केले जात आहे. लेटेस्ट बीटा मध्ये ही फीचर दिसत आहे. व्हॉट्सॲप आपला नवीन पेमेंट सिस्टम खास करून स्पेन साठी खूप चांगले करण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत हे फीचर युजर्संना मिळत नव्हते.

नवीन मीडिया फाइल्स सेक्शन

व्हॉट्सॲप आपल्या ‘Media, Links आणि Docs’ सेक्शनला चांगले बनवण्यासाठी काम करीत आहे. ज्यात शेयर करण्यात आलेल्या मीडिया फाईल्स दिसत आहेत. आता युजर्संना इमेजेस, GIFs आणि व्हिडिओज वेगवेगळे दिसतील शेयर करण्यात आलेल्या फाईल्स सहजपणे शॉर्ट केले जातील. हे सेक्शन कॉन्टॅक्ट इन्फोमध्ये दिसत आहेत. सध्या हे फीचर अधिकृतपणे कधी रिलीज करणार याची तारीख जाहीर करण्यात आली नाही. परंतु, ॲपच्या iOS व्हर्जनवर याची टेस्टिंग केली जात आहे.

नवीन टोन आणि साउंड मिळणार

नवीन व्हॉट्सॲप व्हर्जन युजर्ससाठी नवीन टोन्स आणू शकते. तसेच अनेक जुने बग्सही नवीन अपडेट्समध्ये फिक्स केले जाऊ शकतात. व्हॉट्सॲप एक्सपिरियन्स मेसेजेस फीचर सुद्धा युजर्संना आगामी काळात मिळू शकते. या फीचर्सच्या मदतीने युजर्स मेसेज पाठवण्यासोबतच ते किती वेळात डिलीट होणार हे ठरवतील. मेसेज आपोआप डिलीट होईल. हे फीचर सर्वात आधी ग्रुप चॅटमध्ये देण्यात येणार आहे.