WhatsApp मेसेज आपोआप डिलीट होणार, लवकरच येतंय नवं फीचर

व्हॉट्सॲपमध्ये लवकरच एक नवीन फीचर रोलआउट होण्याची शक्यता आहे. नवीन सेल्फ-डिस्ट्रक्टिंग फीचरसह मेसेज एका विशिष्ट वेळेनंतर ऑटो-डिलीट होणार आहेत.

मुंबई : WhatsApp वर लवकरच सेल्फ-डिस्ट्रक्टिंग (self-destructing) रिपो मेसेंजिग फीचर येणार आहे. व्हॉट्सॲप युजर्स याची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत. लेटेस्ट अँड्रॉइड बीटा ॲपमध्ये आलेल्या अपडेटनुसार खुलासा करण्यात आला आहे की, या फीचरवर आता काम सुरू आहे पण अधिकृत लाँच पूर्वी हे फीचर अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आहे.

WABetainfo नुसार, व्हॉट्सॲपमध्ये हे फीचर Expiring messages म्हणून येणार आहे. यापूर्वी आलेल्या अँड्रॉइड अपडेटमध्ये हे फीचर Delete messages म्हणून आलं होतं. लेटेस्ट व्हर्जन  2.20.197.4 मध्ये युजर्स Settings मध्ये Expiring messages ला इनेबल करू शकणार आहेत. या फीचरमुळे युजर्स सात दिवसांनंतर चॅटमध्ये ऑटो-डिलीट मेसेजचा फीचरचा वापर करू शकतील.

अन्य ॲप्सपेक्षा वेगळं आहे व्हॉट्सॲपचं सेल्फ-डिस्ट्रक्टिंग फीचर

जुन्या बीटा व्हर्जनमध्ये व्हॉट्सॲपच्या एक्सपायरिंग मेसेज फीचर इंडिविजुअल चॅट्स सोबतच ग्रुप चॅट्ससाठीही उपलब्ध असेल याची माहिती दिली होती. या फीचरचा हेतू स्नॅपचॅट सारखे ॲप्सवर असलेल्या सेल्फ-डिस्ट्रक्टिंग मेसेजपेक्षा थोडं वेगळं आहे.

रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सॲपचा उद्देश जुने चॅट्स ऑटो-डिलीट करून चॅट्स आणि ओव्हरऑल ॲपला हलका करण्याचा प्रयत्न आहे. नवीन व्हर्जनमध्ये चॅट डिलीट करण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तर व्हॉट्सॲप ऑटो-डिलीट मेसेजसाठी १ तास, १ दिवस, १ आठवडा, १ महिना आणि १ वर्ष असे ऑप्शन युजर्साला देणार असल्याची शक्यता आहे.

काही अन्य फीचर्सवरही सुरू आहे काम

याशिवाय व्हॉट्सॲप एक नवीन फीचर Mute Always वरही काम करत आहे. याचा वापर करून युजर्सला कायमचा एखादा ग्रुप म्यूट करता येणार आहे. आता व्हॉट्सॲप युजर्स १ वर्षापर्यंतच एखादा ग्रुप म्यूट करू शकतात.

याशिवाय व्हॉट्सॲपमध्ये एक आणखी फीचर मल्टी-डिवाइस सपोर्टही लवकरच येण्याची शक्यता आहे. या फीचरच्या माध्यमातून एका सिंगल फोनसोबत व्हॉट्सॲप अकाउंट एकाच वेळी ४डिवाइसमध्ये वापरता येणार आहे. आता व्हॉट्सॲप युजर्स एका वेळी फक्त एका  डिवाइसमध्येच अकाउंटचा वापर करत आहेत. व्हॉट्सॲप वेबचा वापर करून डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वापरता येते. व्हॉट्सॲप लवकरच ॲडव्हान्स सर्च ऑप्शनही घेऊन येणार आहे. यामुळे युजर्स व्हिडिओ, इमेज, लिंक्स आणि अन्य फाइल फॉरमॅट्स छटपट शोधू शकतील.