Whatsapp : 138 नवीन Emoji, चॅटिंग होणार अजून धमाल

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp वर युजर्सना चॅटिंगचा आनंद घेता यावा यासाठी कंपनी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. आता व्हॉट्सअ‍ॅपवर 138 नवीन Emoji येणार आहेत.

मुंबई : लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp वर युजर्सना चॅटिंगचा आनंद घेता यावा यासाठी कंपनी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. आता व्हॉट्सअ‍ॅपवर 138 नवीन Emoji येणार आहेत. नवीन इमोजी अँड्रॉइडच्या व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन 2.20.197.6 बीटामध्ये टेस्टिंग सुरू आहे असे कंपनीने म्हटले आहे.  टेस्टिंगनंतर सर्व युजर्ससाठी नवीन इमोजी रोलआउट केले जाणार आहेत. WhatsApp चे फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे.

कसे आहेत नवीन इमोजी

नवीन इमोजीमध्ये काही नवीन व्यवसाय- शेफ, शेतकरी, पेंटर यांचा समावेश आहे. यासोबतच व्हीलचेअर असलेले काही इमोजी आणले आहेत. रिपोर्टनुसार नवीन इमोजी जुन्या इमोजींपेक्षा थोडे वेगळे असणार आहेत. यामध्ये नवीन स्किन टोन्स, नवीन कपडे, नवीन हेअरस्टाइल आणि नवीन रंगांचा वापर करण्यात आला आहे.

          (फोटो – WABetaInfo)

     (फोटो – WABetaInfo)

मेसेजसोबत स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी Emoji हा अनेक युजर्ससाठी सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्हालाही नवीन इमोजीचा इतरांच्या आधी वापर करायचा असेल तर यासाठी तुम्हाला गुगल प्लेचा बीटा प्रोग्रॅम जॉइन करणे गरजेचे आहे. दरम्यान, एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता यावं या फीचरवरही WhatsApp कडून गेल्या काही दिवसांपासून काम सुरू आहे. हे फीचरही लवकरच सर्व युजर्ससाठी रोलआउट करण्यात येणार आहे. मल्टिपल डिव्हाइस सपोर्टसाठी ‘ ‘Linked Devices’ नावाचं एक वेगळं सेक्शन व्हाट्सअ‍ॅपच्या मेन्यूमध्ये देण्यात येईल अशी शक्यता आहे. या फीचरमुळे एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटचा वापर किमान चार डिव्हाइसवर करता येणार आहे.