Xiaomi Mi Beared Trimmer 1C भारतात लाँच, मिळणार ढिनच्यॅक फीचर्स

शाओमीचा लेटेस्ट ट्रिमर भारतात लाँच झाला आहे. १ हजार रुपयांहून कमी किंमतीत मिळणाऱ्या या ट्रिमरमध्ये खूपच जबरदस्त फीचर्स आहेत. ट्रिमरमध्ये 600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी आरामात ६० मिनिटांपर्यंत बॅकअप देते.

मुंबई : Xiaomi ने भारतात आपल्या प्रोडक्टची रेंज वाढवत Mi Beared Trimmer 1C लाँच केला आहे. हा गेल्यावर्षी लाँच झालेल्या ट्रिमरच्या तुलनेत वजनाने खूपच हलका आहे. नवा ट्रिमर आकर्षक पद्धतीने डिझाइन केला असल्याने शेव ट्रिम करताना चांगली ग्रिप मिळते. नव्या Mi ट्रिमरची किंमत भारतात 999 रुपये ठेवण्यात आली आहे. काळ्या रंगात येणाऱ्या या ट्रिमरचा सेल फ्लिपकार्ट आणि mi.com वर सुरू झाला आहे.

Mi ट्रिमर 1C चे फीचर्स

शाओमीच्या या नवीन ट्रिमरमध्ये सेल्फ शार्पनिंग ब्लेड देण्यात आले आहेत. हा युजरची शेव खूपच योग्य पद्धतीने ट्रिम करतो. ट्रिमरमध्ये सेल्फ शार्पनिंग ब्लेड सेट करण्यासाठी २० लेंथ सेटिंग्स दिल्या आहेत. ट्रिमरमध्ये 600mAh ची बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर हा ६० मिनिटांपर्यंत सहज चालतो असा कंपनीचा दावा आहे.

ट्रिमरला फुल चार्ज होण्यासाठी जवळपास २ तासांचा कालावधी लागतो. यात एक LED बॅटरी इंडिकेटरही दिला आहे. यामुळे ट्रिमरची बॅटरी किती शिल्लक आहे हे कळते. ट्रिमर लॅपटॉप किंवा पावरबँकचा वापर करून चार्जही करता येणार आहे. युजरच्या सेफ्टीसाठी यात खास ट्रॅव्हल लॉक फंक्शनही देण्यात आले आहे यामुळे नकळत लॉक होण्यापासून प्रतिबंध होणार आहे.

ट्रिमर किटमध्ये कंपनी एक कंगवाही देणार आहे. याशिवाय रिटेल बॉक्समध्ये क्लिनिंग ब्रश, एक मायक्रो युएसबी चार्जिंग केबल आणि एक ट्रॅव्हल पाउच मिळेल. ट्रिमरवर एक वर्षाची वॉरंटी असणार आहे.