Redmi Note 9 स्मार्टफोनचा आज सेल, डिस्काउंटसह मिळणार अनेक ऑफर्स

शाओमीचा सब ब्रँड रेडमीचा Redmi Note 9 स्मार्टफोन आज खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. दुपारी १२ वाजता या फोनचा सेलचे आयोजन करण्यात आले आहे. फोनवर काही आकर्षिक ऑफर्स दिल्या जाणार आहेत.

मुंबई: रेडमीचा जबरदस्त स्मार्टफोन Redmi Note 9  आज खरेदी करण्याची मोठी संधी आहे. हा फोन आज दुपारी १२ वाजता ॲमेझॉन इंडिया आणि mi.com वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये असून या फोनमध्ये ५ कॅमेरे, तगडा प्रोसेसर आणि दमदार बॅटरी यासारखे भन्नाट फीचर्स मिळणार आहेत.

किंमत आणि ऑफर

रेडमी नोट ९ तीन वेरियंटमध्ये येतो. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजच्या फोनसोबत १४ हजार ९९९ रुपयांचा टॅग येतो. आजच्या सेलमध्ये काही बेस्ट डिल्स ऑफर करण्यात आल्या आहेत. यात फोन खरेदी करता येऊ शकतो.

फोन सिटी बँक क्रेडिट कार्डवरून ईएमआयवर खरेदी केल्यास ५ टक्के किंवा १२०० रुपयांचा तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. तसेच एचएसबीसी बँकेच्या कॅशबॅक कार्डवर फोन खरेदी केल्यास ५ टक्के सूट मिळणार आहे.

रेडमी नो ९ ची वैशिष्ट्ये

>> 1080×2340 पिक्सल रेझोल्युशन
>> ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
>> ६ जीबी रॅम पर्यंत ऑप्शन सोबत मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर
>> फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार रिअर कॅमेरे
>> यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आणि
>> ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर सोबत २ मेगापिक्सलचे कॅमेरे
>> ज्यात एक मायक्रो आणि एक डेप्थ सेन्सर
>> सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला १३ मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा
>> ५१२ जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढविण्याची सोय.
>> पॉवर देण्यासाठी 5,020mAh ची बॅटरी
>> २२.५ वॉटची फास्ट चार्जिंग आणि ९ वॉटचा रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट
>> रिअर फिंगरप्रिंट सेन्सर