
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महा मेट्रो नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस आज नागपूर येथे संपन्न झाला. यामध्ये विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, शारिरिक शिक्षण क्रीडा विभाग तसेच संबंधित इतर संघटना सहभागी झाल्या होत्या. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व स्वातंत्र्याचे ७५ वर्ष या अनुषंगाने तब्बल ७६ मिनिट या महा मेट्रो मध्ये योग्य सत्र सुरु होते. या मध्ये विद्यार्थी वर्ग, प्राध्यापक तसेच अधिकारी वर्गाने हिरीरीने सहभाग घेतला. यात सन्माननीय कुलगुरू, प्र-कुलगुरू, महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा योगा करून योग दिवस साजरा केला.

अशा प्रकारे महा मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.



