दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत आहेत. अशातच ‘777 चार्ली’ (777 Charlie) हा चित्रपट १० जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रक्षित शेट्टी (Rakshit Shetty) हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘777 चार्ली’  या चित्रपटामध्ये एका व्यक्तीचे श्वानासोबत असणारे नाते दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट कन्नड, मल्याळम, तमिळ, हिंदी आणि तेलगू या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.