मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर निघाली ‘बाप्पाच्या पालखीची’ मिरवणूक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने यंदाच्या वर्षी गणेश उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केलाय. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (CSMIA) उत्सव साजरा करण्यासाठी खास ‘गणपती पालखी’ मिरवणुकीचे आयोजन केले होते. या ठिकाणी अतिशय पारंपरिक पद्धतीने बाप्पांची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत अनेकांनी पारंपारिक वेशभूषा केली होती. लेझीम खेळणाऱ्या मुलींचं एक पथकही यात सामील झालं होतं. CSMIA कर्मचाऱ्यांनीही या उत्सवात उत्साहात भाग घेतला होता. ढोल, ताशाच्या गजरात ही मिरवणूक निघाली, जी अनेक प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता.

  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने यंदाच्या वर्षी गणेश उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केलाय. लेझीम खेळणाऱ्या मुलींचं एक पथकही यात सामील झालं होतं.

   

  गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (CSMIA) उत्सव साजरा करण्यासाठी खास ‘गणपती पालखी’ मिरवणुकीचे आयोजन केले होते.

   

  ढोल, ताशाच्या गजरात ही मिरवणूक निघाली, जी अनेक प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता. या ठिकाणी अतिशय पारंपरिक पद्धतीने बाप्पांची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत अनेकांनी पारंपारिक वेशभूषा केली होती.

   

  CSMIA कर्मचाऱ्यांनीही या उत्सवात उत्साहात भाग घेतला होता.