‘आठवा रंग प्रेमाचा’ (Aathva Rang Premacha) या चित्रपटाचा टीझर लाँच (Aathva Rang Premacha Teaser)  झाला आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि विशाल आनंद (Vishal Aanand) ही नवी जोडी या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदिनाथ पिक्चर्सचे आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. खुशबू सिन्हा यांचे दिग्दर्शन  आहे. चित्रपटात मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशाल आनंदचा हा पहिलाच सिनेमा आहे.