बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या ‘आत्मपॅम्फ्लेट’(Aatmapamphlet Teaser) या किशोरवयीन प्रेमाची कथा सांगणाऱ्या चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज झाला आहे. ‘वाळवी’च्या भव्य यशानंतर परेश मोकाशी (Paresh Mokashi) पुन्हा एकदा एक नवीन लेखन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे नाव वेगळे आहे त्यामुळे ‘आत्मपॅम्फ्लेट’ म्हणजे काय याचे उत्तर प्रेक्षकांना 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात मिळेल. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित ‘आत्मपॅम्फ्लेट’चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत. त्यामुळे या चित्रपटाशी अनेक नामवंत नावे जोडली गेली आहेत.