अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या ‘घुमर’ (Ghoomer) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये एका खेळाडूची भावना, जिद्द आणि कष्ट दिसत आहेत. आर. बाल्की दिग्दर्शित आणि होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित ‘घुमर’ हा चित्रपट 18 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते की, एका अपघातात सैयामी तिचा एक हात गमावते. सैयामी ही क्रिकेटपटू असते. अपघातानंतर एका हातानं क्रिकेट कसं खेळायचं? असा प्रश्न सैयामीला पडलेला असतो. तितक्यात तिच्या आयुष्यात एका कोचची एन्ट्री होते. अभिषेक बच्चन या कोचच्या भूमिकेत दिसणार आहे.