‘सलमान सोसायटी’ (Salman Society) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील ‘अभ्यासू किडा’ (Abhyasu Kida) हे गाणं रिलीज झालं आहे. उपेंद्र लिमये (Upendra Limaye), विनायक पोतदार आणि नितीन एम यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आले. बच्चे कंपनीला भूरळ पाडणारं हे गाणं आहे. ‘अभ्यासू कीडा’ हे गाणं श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केलं आहे. गायक सुहास सावंतने हे गाणं गायलं आहे. अमित बाईंगने हे गाणं कोरियोग्राफ केलं आहे.‘सलमान सोसायटी’ चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप, शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एंटरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत केली आहे. अवंतिका दत्तात्रय पाटील आणि व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत ‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे.  ‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट 17 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.