1/5

दाक्षिणात्य सुपरस्टार राणा डग्गुबती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तसेच राणा आणि मिहीका बजाज यांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला असून, राणाने आपल्या हळदीचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मिहीका बजाज ही एक इंटिरिअर डिझायनर असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे. तसेच येत्या ८ ऑगस्टला राणा आणि मिहीकाचा विवाह सोहळा पार पडणार आहे.राणा आणि मिहीकाचा लग्नसोहळा हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत पार पडणार आहे.
2/5

राणाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मिहिका बजाजसोबतचा फोटो शेअर करत तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं.
3/5

अभिनेता राणा डग्गुबतीने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू आणि तमिळ चित्रपटांपासून केली होती. तसेच त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील कामं केली आहेत. एक उत्तम अभिनेता, निर्माता आणि उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून त्याची ओळख आहे.
4/5

बाहुबली या चित्रपटामध्ये राणाने भल्लालदेव ही भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून आणि प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
5/5

राणा डग्गुबतीचा हाथी मेरे साथी या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर फ्रेबुवारी महिन्यात प्रदर्शित करण्यात आलं होत. तसेच हा पोस्टर तेलुगू, तमीळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.