
अभिनेता प्रभास (Prabhas) आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon) यांचा "आदिपुरुष" (Adipurush) या चित्रपटाच टिझर रिलिज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावक ट्रोल करण्यात आला होता. यावरुन अनेक वादही झाले. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभास आणि क्रितीच्या साधेपणावर चाहते भाळले आहेत.