‘भीक म्हणून मिळालेलं स्वातंत्र्य’ या वक्तव्यानंतर रात्री उशिरा कंगणा रणौत ने केली जंगी पार्टी, पहा Photos

After the statement of 'freedom in begging', Kangana Ranaut had a lot of party late night, see photos: बॉलिवूडची सतत बडबड करणारी, चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) काल रात्री उशिरा पार्टी केली. 'भीक म्हणून मिळालेलं स्वातंत्र्य' या वक्तव्यानंतर तिचे पार्टी करतानाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंवर अनेक सोशल मीडिया युजर्सने आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कंगनाने अपकमिंग फिल्म तेजसचे शुटिंग पूर्ण केल्यानंतर टीमसाठी एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या दरम्यान अभिनेत्री गोल्डन-शिमर ड्रेसमध्ये दिसली. यासोबतच पापाराझींना स्वत:चे बरेच फोटो काढण्याचीही परवानगी होती. कंगना रणौत पार्टीत खूप थिरकताना दिसली. पार्टीशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तुम्हीही त्यावर कटाक्ष टाका (फोटो साभार- @सोशल मीडिया)