पारंपारिक पद्धतीने पार पडला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा! सचिन तेंडुलकर ते सलमान खानसह अनेक सेलेब्रिटी उपस्थित

राधिका मर्चंट (Radhika Merchant) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी आज म्हणजेच १९ जानेवारी २०२३ रोजी कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पूर्ण विधींनी साखरपुडा (Ring Ceremony) सोहळा पार पडला. हा सोहळा मुंबईतील अंबानींच्या घरी अँटिलिया (Ambani’s Mumbai Home Antilia) येथे पार पडला.

  pic credit - pinkvilla
  बॅालिवूड मधील सर्वात आवडतं कपल असलेलं दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी या साखरपुडा सोहळ्याला हजेरी लावली होती. रणवीर नेहमीप्रमाणे हटक्या लूकमध्ये पाहायला मिळाला. त्याने काळ्या कलरची शेरवानी परिधान केली होती तर लाल साडीमध्ये दिपीकाचं सौंदर्य आणखी खुलुन दिसत होेतं.

   

  क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंट सोहळ्याला हजेरी लावली. सचिनने सोनेरी रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता तर त्याची पत्नी अंजली पारंपारिक निळ्या साडीत सुंदर दिसत होती.
  pic credit - pinkvilla
  अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि त्याचा मुलगा आर्यन खानने या सोहळ्याला हजेरी लावली होती. पठाण चित्रपट रिलीजच्या मार्गावर असल्यामुळे शाहरुख खान मात्र या समारंभात गैरहजर होता.
  अभिनेता अक्षय कुमारने पांरपारिक अंदाजात या सोहळ्याला हजेरी लावली आणि नेहमी प्रमाणे फोटोसाठी कुल पोज दिली.

   

  पती विकी कौशल शिवाय अभिनेत्री कतरिना कैफने या समारंभाला हजेरी लावली. पाढंऱ्या रंगाच्या ड्रेस त्यावर जड-भरतकाम केलेल्या जॅकेटमध्ये कतरिना खूप सुंदर दिसत होती. नेहमीप्रमाणे, कतरिना कैफने तिचे केस मोकळे सोडले होते आणि मेक-अप साधा केला होता.
  अभिनेत्री ऐश्वर्या रॅाय मुलगी आराध्या सोबत
  जान्हवी कपूर बहीण खुशी कपूर सोबत
  नेहमी आपल्या कपड्यांच्या हटके स्टाईलमध्ये सर्वांच लक्ष वेधून घेणारा दिग्दर्शक करण जोहर