अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) शिवानी बावकरचं (Shivani Baokar) नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. एव्हरेस्ट म्युझिकच्या (Everest Music) युट्युबवर हा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. ‘नाते नव्याने’ (Naate Navyane) या गाण्याचा टीझर आणि ट्रेलर बुधवारी दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ‘नाते नव्याने’ (Naate Navyane Song)  हे गाणं शुक्रवारी रिलीज करण्यात आलं. गाण्याला संगीत रसिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. हे गाणे एका प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर आकाराला येते. मायरा आणि जय यांच्यातील ही प्रेमकथा आहे. ‘नाते नव्याने’ या गाण्याच्या लाँचला अजिंक्य राऊत, शिवानी बावकर आणि इतर कलाकार तसेच दिग्दर्शक ओमकार एच माने, गायक हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, संगीत दिग्दर्शक श्रवण दंडवते, गीतकार मुरलीधर राणे आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते.