अमेझॉन प्राइम डे सेल : टीव्ही खरेदी करण्याची हीच वेळ, वनप्लस टीव्हीवर मिळणार मोठी सूट

जर आपण नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. अमेझॉन प्राइम डे सेलमध्ये टीव्ही कॅटेगरीत मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच नवीन लाँच झालेले प्रॉडक्ट्सही या सेलमध्ये खरेदी करता येऊ शकतात.

स्मार्ट टीव्हीवर बंपर सूट,  मिळत आहेत आकर्षक ऑफर्स

जर आपण नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. अमेझॉन प्राइम डे सेलमध्ये टीव्ही कॅटेगरीत मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच नवीन लाँच झालेले प्रॉडक्ट्सही या सेलमध्ये खरेदी करता येऊ शकतात. पाहा Amazon Prime Day Saleमध्ये आपण कोणता टीव्ही घेऊ शकता, जाणून घ्या लिस्ट

Hisense TV

अमेझॉन प्राइम डे सेलमध्ये Hisense TV लाँच झाला आहे. हे टीव्ही ४ स्क्रीन साइझमध्ये लाँच करण्यात आले आहेत.  32 इंच, 40 इंच  आणि 43 इंच. हे टीव्ही क्रमश: 11,990, 18,990 आणि 20,990 रुपयांत उपलब्ध आहेत. 32 इंच एलईडी स्मार्ट टीव्ही एचडी रेडी आहे. तर 40 आणि 43 इंच टीव्ही फुल एचडी स्क्रीन आणि गुगल असिस्टंट सपोर्टसह येतात. हायसेंसने सर्व टीव्हींवर ५ वर्षांची वॉरंटी ऑफर केली आहे. तर 43, 50 आणि 55 इंच अँड्रॉइड टीव्हीत 4K रिझोल्युशन, डॉल्बी एटमॉस आणि अल्ट्रा डिमिंग फीचर्स आहेत.यांची किंमत अनुक्रमे  24,990 रुपये, 29,990 रुपये आणि  33,900 रुपये आहे.

TCL 65-inch TV

टीसीएलकडे 25 हजार आणि 35 हजार रुपयांच्या रेंजमध्ये मोठे स्क्रीनवाले टीव्ही आहेत. 65 इंचाचे टीव्ही सेलमध्ये 49,999 रुपयांत खरेदी करता येतील. अल्ट्रा एचडी 4के टीव्ही एआय गुगल असिस्टंट, गुगल कास्ट, एचडीआर आणि दुसऱ्या फीचर्ससोबत येतो. यात मायक्रो डिमिंग फीचर आहे आणि हा अँड्रॉइड ९ प्रणालीवर चालतो. तसेच यात २० वॅटचा साउंड आऊटपुट आहे.

Vu 50-inch TV with soundbar

Vu ने 50 इंच अल्ट्रा एचडी 4के टीव्ही 40 वॅट साउंडबारसह लाँच केला आहे आणि यात क्रोमकास्ट इनबिल्ट आहे. हा टीव्ही एक फुल स्मार्ट टीव्ही पॅकेज आहे. यात  बेजल-लेस डिझाइन, डॉल्बी विजन सपोर्ट, क्रिकेट आणि गेमिंग मोड्स देण्यात आले आहेत. हा अँड्रॉइड ९ पाय वर चालतो आणि यात ब्लूटूथ 5.0 दिले आहे. याची किंमत 34,999 रुपये आहे.

MI TV

माफक दरातील रेंजमध्ये शाओमी मी टीव्हीचा जलवा कायम आहे. 32 इंच एच डी रेडी स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत 11,999 रुपये आहे. तर 43 इंच अल्ट्रा एचडी टीव्ही  21,999 रुपयांत येतो. याची किंमत खूपच कमी झाली आहे. जर आपण मोठ्या स्क्रीनचा टीव्ही घेणार असाल तर 50 इंच, 55 इंच आणि 65 इंच स्क्रीन साइझची निवड करू शकता. याची किंमत अनुक्रमे 29,999, 34,999 आणि 54,999 रुपये आहे. या टीव्हीत डॉल्बी ऑडियो आणि डीटीएस एचडी तसेच  4K HDR 10 सारखे फीचर्स आहेत.

OnePlus Q1 series

वनप्लसची प्रिमियम टीव्ही सीरीज गेल्यावर्षी लाँच झाली होती आणि याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. 55 इंच OnePlus Q1 4K Ultra HD QLED TV ची किंमत 59,899 रुपये आहे. याचा साउंड आउटपुट 50W आहे आणि हा डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट करतो. या टीव्हीत बेजल लेस डिझाइन असून हा डॉल्बी व्हिजन सर्टिफिकेशन सोबत येतो. तर Q1 Pro हा टीव्ही 99,900 रुपयांत लाँच झाला होता. आता हा 74,999 रुपयांना खरेदी करता येईल. यात एक साउंडबारही उपलब्ध आहे.

सोनी ब्राविया

स्मार्ट टीव्ही कॅटेगरीत सोनी मोठ्या ब्रँड्सपैकी एक आहे. सोनीने प्राइम डे मध्ये 7400H सीरीज लाँच केली आहे. नवीन X1 4K प्रोसेसरसह या टीव्हीत उत्तम पिक्चर क्वालिटी आणि कलरचा आनंद घेता येईल. स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड 9 सपोर्ट करतो. 43 इंच आणि 65 इंच व्हर्जनची किंमत अनुक्रमे 49,999 रुपये आणि 99,999 रुपये आहे. सोनी 55 इंच 4के अल्ट्रा एचडी स्मार्ट  एलईडी टीव्हीवरही मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट मिळत आहे आणि हा 57, 999 रुपयांना खरेदी करता येईल.

Onida Fire TV edition

ओनिडा फायर टीव्ही एडिशन 32 इंच आणि 43 इंच स्क्रीन साइझमध्ये उपलब्ध आहे. ओनिडाच्या या टीव्हीची किंमत अनुक्रमे 10,999 रुपये व 18,999 रुपये आहे. नावावरूनच कळतं की, या टीव्हीत अमेझॉन फायर स्टिकल सारखाच युजर इंटरफेस आहे. टीव्हीचा रिमोटही फायरस्टिक रिमोट सारखाच आहे. प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, Zee5 आणि SonyLIV साठी वेगळ्या बटनासह येतो.

LG TVs with AIThinq

2019 च्या एलटी टीव्हीच्या किंमतीतही कपात झाली आहे. 4K Ultra HD Smart 50 इंच आणि 55 इंच टीव्ही अनुक्रमे 42,999 रुपये आणि 52,999 रुपयांना उपलब्ध आहे. यात ॲक्टिव्ह  HDR, HDR डायनमिक टोन मॅपिंग आणि डीटीएस वर्च्युअल:X आहे. साउंड आउटपुट 20 वॅट आहे पण हा पावरफुल असल्याचा एलजीचा दावा आहे. या टीव्हीची बिल्ड क्वालिटी उत्तम आहे आणि याचा रिअर सेरेमिक आणि डार्क स्टिलचा आहे.