Amitabh-Bachchan rushikesh visit

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी उत्तराखंडमधील ऋषिकेशचा (Rishikesh) दौरा केला. यावेळी त्यांनी धार्मिक कार्यक्रमातही सहभाग घेतला. बिग बींचे पूजा करतानाचे अनेक फोटो (Amitabh Bachchan Rishikesh Photos) आणि व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. या दौऱ्यावेळी अमिताभ बच्चन यांनी परमार्थ निकेतन आश्रमात गंगा आरती (Ganga Aarti) केली. त्यांच्यासोबत स्मानी चिदानंद सरस्वती होते. या फोटोंची बघा एक झलक.

    amitabh bachchan ganga aarti
    अमिताभ बच्चन यांचे अनेक प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत. ते लवकरच अयान मुखर्जींच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये आणि अजय देवगणच्या ‘रनवे 34’ मध्ये दिसणार आहेत.
    amitabh bachchan in rushikesh
    नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी खास भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे सध्या कौतुक होत आहे.
    amitabh bachchan busy in ganga aarti
    अमिताभ बच्चन यांच्या सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ते खूप आस्थेने गंगा आरती करताना दिसत आहेत.
    amitabh bachchan ganga arti photos
    अमिताभ बच्चन यांचे ऋषिकेशमधील गंगा आरती करतानाचे फोटो त्यांच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक प्रोजेक्टचे काम सुरु असताना बिग बींनी धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी वेळ काढला याबद्दल त्यांची स्तुती होत आहे.