धावपटू ललिता बाबर यांच्या आयुष्यावर आधारित ‘ललिता शिवाजी बाबर’ (Lalita Shivaji Babar) या चित्रपटाच्या टीझरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) या चित्रपटात ललिता बाबर यांची भूमिका निभावणार आहे. टीझर लाँच कार्यक्रमात ललिता शिवाजी बाबर, अमृता खानविलकर, प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर, एंडेमॉल शाईन इंडियाचे गौरव गोखले उपस्थित होते.