आजपासून पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू झाले आहे. दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत घोषणाबाजी केली. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता लवकरच जेलमध्ये जाणार, असं ट्विट केला आहे. कंबोज यांच्या ट्विटचे पडसाद आज विधानभवनातसुद्धा पाहायला मिळाले. मोहित कंबोज यांच्याकडे काही पुरावे असतील म्हणून त्यांनी ट्विट केले असेल, असं भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे.