अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तब्बू (Tabu) अभिनीत ‘कुत्ते’ (Kuttey) हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. ‘कुत्ते’या चित्रपटातील पहिले गाणे ‘आवारा डॉग्स’(Awaara Dogs Song) रिलीज झाले असून चित्रपट निर्माता-संगीतकार विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) यांच्या विशाल संग्रहातील हे गाणे चार्टबस्टर ठरणार आहे. अर्जुन आणि तब्बूचा किलर अंदाज या गाण्यात दिसत आहे. गुलजार यांच्या लिरिक्ससह, गाण्यातील शब्द चित्रपट आणि त्यातील पात्रांचे अचूक वर्णन करतात. विशाल भारद्वाज आणि देबर्पितो साहा यांच्या कोरससह हे गाणे विशाल ददलानी यांनी गायले आहे.‘आवारा डॉग्स’ आता लोकांवर आपली जादू चालवण्यासाठी सज्ज आहे. विजय गांगुलीने कोरिओग्राफी करत या गाण्याला चार चांद लावले आहेत.