बॉलीवूड स्टार आयुष्मान खुरानाने (Ayushman Khurana) सर्वांनाच आश्चर्यचा सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘डॉक्टर जी’(Doctor G ) चित्रपटातील ‘ओ स्वीटी स्वीटी’(O Sweetie Sweetie) गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. हे गाणे आयुष्मानने स्वतः गायले आहे. हे गाणे तुमच्या हृदयाचा ठाव घेईल.‘ओ स्वीटी स्वीटी’ ही अमित त्रिवेदीची हृदयस्पर्शी रचना आहे. गाण्याचे बोल राज शेखर यांनी लिहिले आहेत. आयुष्मानच्या आवाजाने जी जादू निर्माण केली असून, हे गाणे त्याच्या सौंदर्यात्मक आणि मिनिमलिस्टिक सेटअपसह एक व्हिज्युअल ट्रीट बनले आहे जे संगीतप्रेमींना थेट परफॉर्मन्सची अनुभूती देते. सुमित सक्सेना, सौरभ भरत, विशाल वाघ आणि अनुभूती कश्यप यांनी लिहिलेला ‘डॉक्टर जी’ १४ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.