‘टीडीएम’ (TDM) चित्रपटातील ‘बकुळा’ या गाण्यातून लग्नाचा माहोल प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘बकुळा’ (Bakula) या गाण्यात लग्नातील धमाल, नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ, पाहुण्यांची लगबग आणि आई, वडील आणि भावाच्या मनातील घुटमळ याचे उत्तम वर्णन करण्यात आलं आहे. डॉ. विनायक पवार यांनी लिहिलेल्या या गीताला नंदेश उमप (Nandesh Umap), प्रियांका बर्वे (Priyanka Barve) आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी आपल्या मधुर स्वरांनी सजवले आहे. हे गाणे ओंकारस्वरूप बागडे आणि वैभव शिरोळे यांनी संगीतबद्ध केले आहे.