सलमान खानने (Salman Khan) आपला आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) मधील ‘बठुकम्मा’हे नवं गाणं रिलीज केलं आहे. ‘बठुकम्मा’(Bathukamma Song) हा तेलंगणातील महिलांद्वारे नऊ दिवस साजरा केला जाणारा सण आहे. सलमानच्या चित्रपटातील या नवीन गाण्याचं नाव या उत्सवावरून ठेवण्यात आलं आहे. तसेच, या गाण्यात सलमान खानदेखील तेलुगू स्टाइलमध्ये दिसत आहे. ‘बठुकम्मा’चं संगीत रवी बसरूर यांनी दिले आहे. तसेच, संतोष वेंकी, ऐरा उडुपी, हरिनी इवातुरी, सुचेता बसरूर, विजयलक्ष्मी मेट्टिनाहोल यांनी गाण्याला आवाज दिला आहे. गाण्याचे बोल शब्बीर अहमद, रवी बसरूर, किन्नल राज आणि हरिनी इवातुरी यांनी लिहिले आहेत. सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनच्या ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.