रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख(Genelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ (Ved Movie)चित्रपटाची उत्सुकता सर्वत्र वाढली आहे.  आयएमडीबीवर (IMDB)  मोस्ट अँटीसिपेटेड फिल्म म्हणून हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. नुकतेच त्यांच्या चित्रपटातील पहिले गीत ‘वेड तुझा’ प्रदर्शित झाले होते. त्या गीताला अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता ‘वेड’च्या निर्मात्यांनी ‘बेसुरी’ (Besuri Song) हे गीत आज प्रदर्शित केले आहे . हे गीत वसुंधरा वी (Vasudhara Vee) यांनी गायले आहे आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. मुंबई फिल्म कंपनीने ‘देश म्यूजिक’ लेबल द्वारे हे गीत प्रकाशित केले आहे .