
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये, अभिनेत्री क्रॉप टॉप आणि शॉर्ट्समध्ये अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिने आपले केस उघडे ठेवले आहेत.
तिच्या या फोटोंमधील खास गोष्ट म्हणजे तिने चेहऱ्यावर मेकअप केलेला नाही.
विदाऊट मेकअप लुकमध्ये मोनालिसाने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही मला मेकअपशिवाय पहावे.’ तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. त्याच्या या फोटोंना आतापर्यंत २७ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.