विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ या चित्रपटाचे भन्नाट ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २० ॲाक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.