मीरा भाईंदर : मेट्रो कर्मचाऱ्यांची दादागिरी सुरूच असल्याचे समोर आले आहे. या अगोदरही या कर्मचाऱ्यांकडून सामान्य नागरिकांशी वाद झाल्याचं दिसून आले आहे. रविवारी मध्यरात्री सिल्व्हर पार्क परिसरात एका तरुणाशी वाद झाल्यानंतर चक्क त्या तरुणाच्या अंगावर क्रेन चढवण्याचा प्रयत्न मेट्रो कर्मचाऱ्यांनी केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या ठिकाणचे काम बंद केले.