स्मृती ईरानी यांच्या स्वदेशीच्या आवाहनाला सेलिब्रिटींचा इन्स्टाग्रामवर असा मिळाला प्रतिसाद

हातमागावर तयार झालेल्या भारतीय वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने देशात ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवसाचे औचित्य साधून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी काल “My Handloom” या मोबाइल ॲप आणि वेबपोर्टलचे उद्घाघाटन केले. 

या वेबपोर्टलवर हातमागावर तयार झालेल्या वस्तूंची खरेदी आणि विक्री करता येणार आहे. यामुळे कारागीरांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून याद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

स्मृती ईरानी यांनी काल वेबपोर्टलचे उद्गाटन झाल्यानंतर स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सेलिब्रिटींनी उत्तम प्रतिसाद दिला आणि आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे फोटोही शेअर केले आहेत. कोणकोण आहेत हे सेलिब्रिटी पाहूया याची एक झलक

श्रेया बुगडे

शिल्पा शेट्टी-कुंद्रा

प्रिती झिंटा

रवीना टंडन

मनीषा मल्होत्रा

विद्या बालन

सोनम कपूर-आहुजा

दिया मिर्झा

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम