अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) ‘शहजादा’ (Shehzada) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याने लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आता ‘या’ चित्रपटातील ‘छेडखानियां’ (Chedkhaniyan Song) गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यावर कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा धमाकेदार डान्स दिसत आहे. दोघांच्या रोमँटीक केमिस्ट्रीवर प्रेक्षक फिदा झाले आहेत. अरिजीत सिंग आणि निखिता गांधी यांनी हे गाणं गायलं असून संगीत प्रितमनी दिलं आहे. आयपी सिंग आणि श्लोके लाल यांनी गाणं लिहिलं आहे. कोरियोग्राफी गणेश आचार्य यांची आहे. अल्लू अर्जुनच्या ‘अला वैंकुठपुरमलो’ या चित्रपटाचा ‘शहजादा’ हा हिंदी रिमेक आहे. रोहित धवननं ‘शहजादा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.