sambhajiraje at raigad

छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Independence Day 2022) साजरा केला. या कार्यक्रमाचे फोटो छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

    sambhajiraje in raigad

    स्वराज्य व स्वातंत्र्याचे मूर्तीमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने व शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे, असे छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी म्हटले आहे.

    sambhaji raje on raigad

    ते पुढे म्हणाले की, अगणित वीरांच्या बलिदानातून १९४७ साली आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती, हे हुतात्मा भगतसिंहांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते.

    raigad sambhajiraje photos

    दुर्गराज रायगडवर ६ जून १६७४ रोजी सार्वभौम स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षे परचक्रात सापडलेल्या भारतभूमीच्या सुपुत्रांना स्वातंत्र्याचा बाणा शिकविला, असेही ते म्हणाले.

    sambhajiraje raigad pics

    यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी रायगडावर तिरंगा फडकावला.

    chatrapati samadhi

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर ते नतमस्तक झाले.

    flag hoisting at raigad