पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde Pune Visit) यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन डॉ. प्रकाश आमटे (Eknath Shinde Meets Prakash Amte) यांची भेट घेतली. आमटे यांच्या प्रकृतीची विचारपूस मुख्यमंत्र्यांनी केली. डॉ. आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुढील उपचार घेत आहेत.